आतां विश्वात्मके देवे,
येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे,
पसायदान हे ||
जे खळांचि व्यंकटी सांडो,
तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो,
मैत्र जीवांचे ||
दुरितांचे तिमिर जावो,
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो
ते लाहो, प्राणिजात ||
वर्षत सकळ मंडळी,
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी,
भेटतु भूता ||
चला कल्पतरूंचे आरव,
चेतनाचिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव,
पीयूषांचे ||
चंद्रमेंजे अलांछन,
मार्तंड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन,
सोयरे होतु ||
किंबहुना सर्व सुखी,
पूर्ण होवोनि
तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं,
अखंडित ||
आणि ग्रंथोपजिवीये,
विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्टविजये,
होआवेजी ||
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो,
हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो,
सुखिया झाला ||