पुंडलीक वरद हरि विठ्ठल | पंढरिनाथ महाराज की जै
शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं
लसत्कुंडलाक्रांतगंडस्थलांतं ।
जपारागबिंबाधरं कंजनेत्रं
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ॥
पंढरीचा राजा उभा भक्तकाजा |
उभारूनि भुजा वाट पाहे ||
घ्यारे नाम सुखें
प्रेमें अलौकिक |
साधनें आणिक करुं नका ||
मनाचेनि मनें
हृदयीं मज धरा |
वाचेनें उच्चारा
नाम माझेम् ||
बोलोनियां ऐसे
उभा भीमातीरीम् |
नामा निरंतरीं
चरणापाशीम् ||
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पांडुरंग
पुंडलीक वरद हरि विठ्ठल | पंढरिनाथ महाराज की जै