गुरुदेवता भजनमंजरी

माझे माहेर

घोषः

पुंडलीक वरद हरि विठ्ठल | पंढरिनाथ महाराज की जै

श्लोकः

प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां
नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् |
विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ||

कीर्तनम् — 2

माझे माहेर पंढरी |
आहे भीवरेच्या तीरी ||

बाप आणि आई |
माझी विठ्ठल रखुमाई ||

पुंडलीक राहे बंधू |
त्याची ख्याती काय सांगू ||

माझी बहीण चंद्रभागा |
करितसे पाप भंगा ||

एका जनार्दनी शरण |
करी माहेरची आठवण ||

नामावलिः

पंढरिनाथ हे पांडुरंग
जय पांडुरंग श्रीपांडुरंग

घोषः

पुंडलीक वरद हरि विठ्ठल | पंढरिनाथ महाराज की जै